Marathi Romantic Scraps

***********************************************************************************
वेड्या मनाला माझ्या,
तुझ्याशिवाय....
आता काही सुचतच नाही...
तू, तू अन फक्त तूच,
त्याच्याशिवाय दुसर काही दिसतच नाही...
अबोल हि प्रीत माझी,
तुला कधीच कळत नाही...
अन वेड हे मन माझ,
तुला पहिल्याशिवाय काही राहवत नाही...
तुला पहिल्याशिवाय,
काही...
राहवतच नाही...
***********************************************************************************
असाव कुणीतरी...........

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी.......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार.........

**********************************************************************************
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.

ऐकणारे कुणीतरी असेल मनातलं बोलायला बरं वाटतं.

कौतुक करणार कुणीतरी असेल तर थकेपर्यत राबायला बर वाटतं,...

नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.

असच आपल कुणीतरी असेल तर,मरेपर्यत जगायला बरं वाटत .......

***********************************************************************************
प्रत्येक गोष्ट मी
नशिबावर नेत नाहि,

कारण माझे नशिब मला
कधी साथ देत नाहि.

दोन अश्रु तेव्हा ओघळ्ले असते
माझे प्रेम तुला हि कळ्ले असते

पण दानात मिळेल ते प्रेम कसले
म्हणुन माझे अश्रु डोळ्यातसुकले.

तुझी आठवण आल्यावर
दुसरे काहि सुचत नाहि

मन अशा ठिकाणी घेउन जाते
जिथे मी माझा उरत नाहि........

***********************************************************************************
सौंदर्या पेक्षाही सुंदर,
तुझे दिसणे आहे..

गुलाबा पेक्षाही कोमल,
तुझे रुसणे आहे..

पारीजाताका पेक्षाही मोहक,
तुझे हसणे आहे..

आणि ह्या सर्वा पेक्षा हिसुंदर,,
तुझे माझ्या जीवनात असणे आहे.   
*************************************************************************************

प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" ............ ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!"
प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" .......... ते फक्त म्हणते कि ," माझ्याच हृदयात राहतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " काय करतेस तू ?" ........... ते फक्त म्हणते कि ."माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " का दूर आहेस तू ?" ........... ते फक्त म्हणते कि ," माझ्या...च जवळ आहेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " माझ्यावर प्रेम करतेस का तू ?" .............. ते फक्त म्हणते, " माझ संपूर्ण आयुष्याच आहेस तू !!"      

************************************************************************************
 अशी असावी ती,

तशी असावी ती,
सारेच करतात विचार कि कशी असावी ती.


मोहक तिचे डोळे असावे,

मादक तिचे ओठ असावे,

सुंदर तिचे बोल असावे,

गाल तिचे गोल असावे.


पाहताच क्षणी तिच्यात हरवून जाव अस सगळ काहि तिच्यात असाव.


पण हे सगळ नसल तरि चालेल फक्त सुंदर तिच मन असाव.


मला तरि वाटत अशीच असावी ती.. खरच अशीच असावी .........


*************************************************************************************

जितकी ओढ मला तुझी ..
तितकीच तुलाही आहे का...?
जितके प्रेम माझे तुझ्यावर तितकेच तुझेही आहे का.....?
मी समोर नसतानाही मला कधी पाहतोस का.....?
एक क्षणी मी दिसावं म्हणून व्याकूळ होतोस का.....?
तो क्षण संपूच नये, असा विचार कधी करतोस का....?
एकांती आपल्या गुजगोष्टी आठवून कधी पाहतोस का?
त्यातल्या प्रतेय्क शब्दाने मोहरून कधी जातोस का?
माझा वेडेपणा पाहून स्वताशी कधी हसतोस का?
माझ्यासोबत वेडे व्हावे असे कधी ठरवतोस का ?
जितके प्रेम माझे तुझ्यावर तितकेच माझ्यावर करतोस का ?   

***************************************************************************************
 आयुष्य पण कसं असतं ना

कुणी तरी परखं आपल्या जीवनात येतं

आणि कधी आपल्या मनात घर करून जातं,

ओळख नसताना ही आवडायला लागतं

जवळ असलं की दूर जावसं नाही वाटतं,

आणि दूर असलं की जवळ हवं हवं स वाटतं

मन सारखं तिचाच विचार करत असतं

जीव पण तिच्या आठवणीत तडपडत असतं

कधी एकदाचं आपलं होतं

याची आतुरतेने वाट पाहत असतं, वाट पाहत असतं. 
 
***********************************************************************************
 आपलं कुणीतरी असण्यापेक्षा आपण कुणाचंतरी असण्यात जास्त आनंद आहेँ.
4
दिवस
झिजण्यापेक्षा एका दिवसाच्या जीवनाला अर्थ आहेँ.
वादळापासून
वाचण्यापेक्षा
वादळात पडून मरण्यात खरं समर्पण आहे.
काठावरुन
डोकावण्यापेक्षा पुराच्या
पाण्यात उडी मारण्यात जास्त आनंद आहे.
आपल्यासाठी
कुणी झुरण्यापेक्षा आपण
कुणासाठी तरी झुरण्यात खरी प्रित आहे.
आणि
म्हणूनच आपलं कुणीतरी
असण्यापेक्षा आपण कुणाचंतरी असण्यात जास्त आनंद
आहेँ


***********************************************************************************
 खुप प्रेम करतो गं तुझ्यावर

तुला समजावु तरी कसे

मन मारावे तु माझ्यासाठी

कधीच अशी माझी अपेक्षा नसे

असा काही ये जिवनात माझ्या

की आपला एकच जीव होईल

स्वर्ग नको फक्त तु ये

स्वर्ग आपोआप तयार होईल...   

***********************************************************************************

No comments:

Post a Comment